ताळमेळ शाखेकडील कामकाज
-
विभागाशी संबंधित 2053, 2029, 2045, 2075, 2245 व 7610 या लेखाशिर्षांचे आठमाही व वार्षिक अंदाजपत्रके जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करुन त्यांची संकलित माहिती शासनास सादर करणे.
-
विभागाशी संबंधित लेखाशिर्षाखाली प्राप्त अनुदानाचे वाटप करणे व खर्चावर नियंत्रण ठेवणे.
-
2245 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त अनुदानातून झालेल्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे.
-
महसूल व वनविभागातंर्गत येणा-या लेखाशिर्षाचे विनियोजन लेखे शासनास सादर करणे.
-
महसूल व वनविभागाअंतर्गत येणा-या लेखाशिर्षाचे उपशिर्षनिहाय ताळमेळ विवरणपत्रे जिल्हाधिकारी/उपआयुक्त (सा.प्र) यांचेकडून प्राप्त करुन महालेखापाल यांचेशी ताळमेळ घेणे
-
जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परिक्षा पथकाने करावयाच्या अंतर्गत लेखा परिक्षणाच्या प्रलंबित घटकांच्या कामाचे प्रगतीवर नियंत्रण ठेवणे. तसेच चलन पडताळणीसह सादर केलेल्या रक्कम रु. 2,00,000/- वरील परिच्छेदास मान्यता देणे.
-
विभागातील अधिकारी / कर्मचा-यांना घरबांधणी/मोटारवाहन/इतर वाहन/ संगणक अग्रिम अंतर्गत प्रकरणे मंजूरीस्तव शासनास सादर करणे.
-
महालेखापाल कार्यालय नागपूर व मुंबई यांचेकडील प्रलंबित असलेल्या परिच्छेद निर्गतीबाबत जिल्हयांकडे पाठपुरावा करणे. तसेच लेखापरीक्षा समिती बैठकीचे (ACM) आयोजन करणे.
-
विभागाशी संबंधित लेखाशिर्षाचे प्राप्त अनुदान व त्या अनुषंगिक झालेल्या कमी/ अधिक खर्चाच्या कारणाबाबतचा जिल्हानिहाय अहवाल लोकलेखा समितीस सादर करणे.
-
उपविभागीय अधिकारी/तहसिलदार यांचेकडे रोख पुस्तकाची अचानक तपासणी करुन शासनास अहवाल सादर करणे.
-
मा. आयुक्त यांचे आदेशान्वये विशेष लेखा परिक्षण, अचानक तपासण्या व इतर सोपविलेली कामे पार पाडणे.