बंद

    सामान्य प्रशासन शाखेकडील कामकाज

    • दंडाधिकारी पत्रव्यवहार, कायदा व सुव्यवस्था बाबत कामकाज करणे. उपोषण, आत्मदहन तक्रारी संदर्भातील कामकाज.

    • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांची व आर्थिकदृष्टया मागास प्रमाणपत्राची वैधता तपासणे बाबतचे कामकाज.

    • विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करणे.

    • आषाढी वारी पालखी सोहळयाचे नियोजन करणे, दिंड्याना अनुदान वाटप करणे.

    • विधान भवन, पुणे येथे होणा-या सर्व बैठकांसाठी सभागृहांमधील नियोजन पहाणे.

    • विभागीय आयुक्त हे मतदार यादी निरिक्षक असलेने मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रम बाबतचे कामकाज करणे.

    • विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे हे शिक्षक-पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यासंबंधी निवडणूकीचे कामकाज.

    • भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना व त्याप्रमाणे पुणे विभागाचा एकत्रित अहवाल तयार करणेबाबतचे कामकाज या शाखेकडून करणे.

    • लोकसभा, विधानसभा निवडणूकांचे कामकाज सनियंत्रण करणे.

    • विभागीय आयुक्त यांचेकडील हद्दपार अपील प्रकरणांचे कामकाज, शस्त्र परवाना अपिलांचे कामकाज करणे व फटाका लायसेंन्स अपिलाचे कामकाज.

    • महसूल विभागाचे इमारत बांधकाम प्रस्ताव शासनास सादर करणे.

    • शासकीय विभागांच्या कार्यालयांकरिता जागा वाटप बाबतचे कामकाज करणे व शासकीय निवासस्थान वाटप समितीचे कामकाज.

    • अल्पसंख्यांकांबाबतचे कामकाज करणे.

    • शासकीय समारंभ (26 जानेवारी, 15ऑगस्ट, 1 मे इ.) आयोजनाचे कामकाज करणे.

    • शासनाकडून वेळोवेळी जाहिर केलेले उपक्रम याबाबतचे कामकाज करणे. उदा. सेवा पंधरवडा.

    • सेवा हमी कायदा बाबतचे कामकाज.

    • माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबतचे कामकाज.

    • राजीव गांधी गतीमान प्रशासन, पद्मश्री पुरस्कार, बाल स्नेही पुरस्कार, पंतप्रधान पुरस्कार कामकाज.

    • सार्वजनिक बांधकाम विभागाचे मार्फत विधान भवन परिसर देखभाल, दुरुस्ती करुन घेणे.

    • शासकीय वाहनाबाबतचे कामकाज.

    • विभागीय आयुक्त कार्यालयाचे मध्यवर्ती अभिलेख कक्षाचे कामकाज.

    • विभागीय आयुक्त कार्यालयाचे मध्यवर्ती आवक- जावक कक्षाचे कामकाज.