बंद

    सेवा पंधरवडा साजरा करणेबाबत बैठक

    प्रकाशित तारीख: September 7, 2025
    306fb91c-4504-48d1-a269-53f8fc0ad403

    महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रं.मराअ/प्र.क्र.63/ (ई ऑफीस क्रं. 126378/समन्वय-1, दिनांक 1 सप्टेंबर 2025 अन्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियांनातर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयाची अमंलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मा. विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 03/09/2025 रोजी पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उप अधिक्षक, भूमी अभिलेख, सर्व मुख्याधिकारी, (नगर पालिका) तसेच सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत पहिल्या टप्पा- पाणंद रस्ते विषयक मोहिम, दुसऱ्या टप्पा- सर्वासाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम व तिसऱ्या टप्पा- जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणेत येणार आहे. त्या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी केलेल्या नियोजनाचा आढावा तसेच प्रत्येक जिल्हयातील एक तहसिलदार व तालुक्यातील तलाठी यांचेकडून सदर सेवा पंधरवाडयात करावाचे कामकाजाचा सविस्तर आढावा मा. विभागीय आयुक्त महोदय यांनी घेतला व त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा स्पष्ट सुचना सदर बैठकीत सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांना दिल्या.

    c8ec9dd1-f907-4b6d-8f54-bcbb3600475c

    306fb91c-4504-48d1-a269-53f8fc0ad403