- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
- केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियानांची अमंलबजावणी करणे.
- विविध सरकारी कार्यालयांमध्ये समन्वय साधणे.
- विविध सरकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे अभिसरण करणे.
- अधिनस्त कार्यालयांमार्फत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सेवा जलद, तत्परतेने व सहजरित्या उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करणे.
- अधिनस्त कार्यालयांमध्ये अधुनिक तंत्रज्ञान व नागरीक केंद्रीत पध्दतींचा वापर वाढविणे.
- आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यात समन्वय आणि सनियंत्रण करणे.
- विभागात कायदा आणि सुव्यवस्था राखणे.
- सार्वजनिक तक्रारींचे निवारण करणे.
- जनतेला भेटणे आणि त्यांच्या समस्या दर्जेदार पद्धतीने सोडवणे.
- अपीलीय आणि पुनरीक्षणीय अधिकार क्षेत्राशी संबंधित न्यायालयांचे कामकाज करणे.
- अधिनस्त कार्यालयांचे वार्षिक निरीक्षण / तपासणी करणे आणि त्यांना प्रभावी कामकाजासाठी मार्गदर्शन करणे.
- विविध शासकीय योजना, कामकाज यांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी नियतकालीक बैठका आणि परिषदा आयोजित करणे व अमंलबजावणीचा आढावा घेणे.
- जमीन महसूलांचे पर्यवेक्षण, महसूलाचा निपटारा आणि अधिनस्त कार्यालयासमोर दाखल केलेल्या खटल्यांचे सामुहिक पर्यवेक्षण करणे.
- जमीनीच्या नोंदीचे वेळेवर देखभाल सुनिश्चीत करणे.
- टंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सनियंत्रण करणे.
- माहिती अधिकार कायदा-२००५ अंतर्गत अर्जदारांनी पाठविलेल्या अर्जांचा विहीत मुदतीत निपटारा करणे.