दृष्टीकोन आणि ध्येय
दृष्टीकोन
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचा दृष्टीकोन हा पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील नागरीकांना जलद व तत्पर सेवा पुरवून त्यांचे परिपुर्ण समाधान साधणे तसेच नागरीकांना या सेवा सहजरित्या उपलब्ध होतील यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करणे आणि सर्व शासकीय योजना तळागळापर्यंत व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.
ध्येय
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे ध्येय हे पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील नागरीकांना दर्जेदार सेवा पुरविण्यात याव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व नागरीक केंद्रीत पध्दतींचा अधिनस्त कार्यालयांमध्ये वापर वाढविणे, तसेच अधिनस्त कार्यालयांवर प्रभावी सनियंत्रण ठेवून शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त, गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे आहे.