बंद

    तीर्थक्षेत्र विकास शाखा माहिती

    • तारीख : 24/01/2025 -

    संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चतुर शताब्दी वर्षानिमित्त श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर व पालखीतळ मार्ग विकासाचा विशेष आराखडा तयार करण्यात आला. या विकास आराखड्यास मंत्रिमंडळांनी दिनांक 13 मे, 2009 रोजी तत्त्वतः मान्यता दिली तर नंतर शासन निर्णय दिनांक 2 जून, 2009 नुसार रुपये 450.00 कोटीच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. शासन निर्णय दिनांक 15 जून, 2011 नुसार रुपये 512.66 कोटी रकमेच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. तदनंतर शासन निर्णय दिनांक 12 सप्टेंबर, 2014 नुसार शिखर समितीमध्ये आढावा घेऊन रुपये 109४.८९ कोटी रकमेच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. सुधारित आराखड्यामध्ये श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा डोंगर नेवासा पंढरपूर व पालखी मार्ग येथील मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार शासन निर्णय दिनांक 13 नोव्हेंबर, 2018 नुसार रुपये १३०३.८५ कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. आर्थिक व भौतिक सद्यस्थितीचा गोषवारा खालीलप्रमाणे.

    जिल्हा व आराखडा निहाय विकास कामे भौतिक सद्यस्थिती गोषवारा
    अ.क्र. आराखडा एकूण कामे पूर्ण कामे प्रगतीपथा- वरील कामे सुरु न झालेली कामे वगळणे प्रस्तावित असलेली कामे
    1 देहू 32 23 2 1 6
    2 आळंदी 40 24 8 3 5
    3 भंडारा डोंगर 9 2 0 7 0
    4 सदुंबरे 6 3 0 3 0
    एकूण जिल्हा पुणे 87 52 10 14 11
    5 पंढरपूर विकास कामे 63 39 8 4 12
    6 सातारा पालखीतळ मार्ग 23 18 0 0 5
    7 नेवासा 14 10 1 2 1
    आराखडा एकूण 187 119 19 20 29
    विकास कामांची आर्थिक सद्यस्थिती गोषवारा (रु. कोटीत)
    अ.क्र. जिल्हा मंजूर निधी प्राप्त / वितरित निधी प्रत्यक्ष खर्च
    1 देहू 178.77 159.88 159.88
    2 आळंदी 258.67 150.54 148.73
    3 भंडारा डोंगर 16.89 11.03 11.03
    4 सिंदबरे 7.95 7.95 7.95
    5 पालखीतील विकास कामे 42.72 37.23 34.44
    6 पालखीतील भूमीसंपादन 34.92 30.93 30.93
    7 देहू-आळंदी भूमीसंपादन 220.14 166.35 166.35
    पुणे जिल्हा 760.06 563.91 559.31
    8 पंढरपूर विकास 398.35 274.69 274.69
    9 पंढरपूर भूमीसंपादन 25.80 24.77 24.77
    10 पालखीतील विकास 21.48 18.56 13.35
    11 पालखीतील भूमीसंपादन 28.50 7.22 3.44
    सोलापूर 474.13 325.24 316.25
    12 पालखीतील मार्ग 12.22 12.17 11.11
    13 पालखीतील विकास 13.25 10.71 10.71
    14 पालखीतील भूमीसंपादन 29.45 0 0
    सातारा 474.13 325.24 316.25
    15 नेवास (अहमदनगर) 14.74 13.26 13.26
    आराखडा एकूण 1303.85 925.29 910.64
    जिल्हानिहाय पालखीतळ विकास कामे व भौतिक सद्यस्थिती गोषवारा
    अ.क्र. जिल्हा व पालखीतळ मंजूर पालखीतळ कामे पूर्ण पालखीतळ कामे प्रगतीपथ-वरील पालखीतळ कामे सुरू न झालेली पालखी तळ कामे वगळलेले पालखी तळ कामे
    1 पुणे – 24 13 10 3 0 0
    99 65 26 8 0
    2 सोलापूर – 15 7 3 4 0 0
    36 21 8 2 5
    3 सातारा – 5 4 0 4 0 0
    29 23 2 3 1
    एकूण – 44 24 13 11 0 0
    164 109 36 13 6

    अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार करणे विकास आराखडा –
    अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार करणे या विकास आराखड्यास शासनाच्या नियोजन विभागाच्या दिनांक 10/10/2024 च्या शासन निर्णयानुसार रक्कम रुपये 92.19 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये खालील प्रमाणे गणपती मंदिरांचा समावेश आहे
    पुणे जिलहा – मोरगाव, थेऊर, ओझर, रांजणगाव
    रायगड जिल्हा – महाड व पाली
    अहिल्यानगर जिल्हा – सिद्धटेक
    या एकूण सात गणपती मंदिरांचा समावेश आहे.
    टीप: लेण्याद्री येथील गणपती मंदिराचा सामावेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतील असल्याने आराखड्यात करण्यात आलेला नाही. 

    अंतर्गत रेखाचित्रे करावयाची कामे आली छायाचित्र.

    घटाचा बंधकमसोलापूर नवीन पूल सिद्धभेट

    इंद्रायणी नदी

     

    सोलापूर जुना पूल

    उडियान

    येळवाडी – देहू

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन