नमामि चंद्रभागा अभियान –
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे तर्फ़े भीमा ८/२०१६ अन्वये नमामि चंद्रभागा अभियान हे अत्यंत महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान हे भीमा नदी व तिच्या सर्व उपनद्या निर्मळ, पवित्र व प्रदूषणमुक्त करणेकरीता राबविण्यात येत आहे. सदर अभियानास दि. ४ ऑक्टोबर २०२४ च्या नगरविकास विभागाकडील शासन निर्णयान्वये २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लाभार्थी:
स्थानिक स्वराज्य संस्था पुणे व सोलापूर जिल्हा
फायदे:
नदीचे पर्यावरणीय आरोग्य राखणे आणि प्रदूषणमुक्त करणे
अर्ज कसा करावा
स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत विभागीय कार्यकारी समितीकडे सादर करणे