बंद

    माझी वसुंधरा अभियान (नागरी) –

    • तारीख : 01/04/2024 -
    • क्षेत्र: पुणे विभाग

    महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांसाठी राबविण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा उपक्रम आहे. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपायांची अंमलबजावणी करणे आणि वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपुरक कृती उपक्रमांवर नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे, या बाबी समाविष्ट केल्या आहेत. या अभियानाची रचना कार्बन सिक्वेस्ट्रेशन, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या वातावरणीय बदलाच्या तीन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आली आहे.

    पुणे विभागाच्या वतीने पर्यावरणविषयक उपक्रम राबविले जातात. सदर अभियानाअंतर्गत पुणे विभागास सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे. त्यातून हरित शहरे आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची मदत होत आहे.

    लाभार्थी:

    स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी)

    फायदे:

    नाविन्यपूर्ण पद्धतीने विविध हवामान बदल शमन उपक्रमांमध्ये सक्रिय नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहन देणे.

    अर्ज कसा करावा

    https://abhiyanmis.majhivasundhara.in/