बंद

    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

    • तारीख : 01/04/2024 - 31/03/2025
    • क्षेत्र: पुणे विभाग

    सन 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
    केंद्र शासनाद्वारा दि. 2 ऑक्टोबर,2014 पासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सवेर्क्षणा नुसा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र एप्रिल-2018 मध्ये हागणदारी मुक्त झाला आहे. सदर अभियानांतर्गत वैयक्तीक , शैाचालयाचा शाश्वत वापर करणे, गावातील संपूर्ण परिसर , शाळा,आंगणवाडी, शासकीय/निमशासकीय इमारती, कार्यालये,सहकारी संस्था, सार्वनिक बाजार, एस.टी. स्टँड,यात्रा स्थळे, पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणे स्वच्छ ठेवणे हा उद्देश असून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून कार्यवाही करण्यात येत आहे.
    तपासणी मुद्दे –
    1 पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन 2. शौचालय व्यवस्थापन
    3. घनकचरा व्यवस्थापन 4. सांडपाणी व्यवस्थापन
    5.मैलागाळ व्यवस्थापन 6. घर,गाव, परिसर स्वच्छता
    7. वैयक्तिक स्वच्छता
    8. लोक सहभागआणि वैयक्तिक व सामुहिक पुढारातून विकासासाठी साबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम

    लाभार्थी:

    जिल्हा परिषद, पंचायत समिति आणि ग्रामपंचायत कार्यालये

    फायदे:

    विभाग स्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायती 1. प्रथम पुरस्कार रू. 12 लक्ष 2. द्वितीय पुरस्कार रू. 9 लक्ष 3. तृतीय पुरस्कार रू. 7 लक्ष विभाग स्तरावरील विशेष पुरस्कार 1. स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन – रू. 75000 /- 2. डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन - रू. 75000/- 3. स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार – शौचालय व्यवस्थापन रू. 75000/-

    अर्ज कसा करावा

    विभागस्तरीय अंमलबजावणी , सनियंत्रण व मुल्यमापन समिती मार्फत