स्वच्छ भारत मिशन (नागरी) –
स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आले आहे. अभियानाचे उद्दिष्ट देशास उघडयावर शौचास जाण्यापासून मुक्त करणे आणि देशातील 4,041 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घनकचऱ्याचे 100% वैज्ञानिक व्यवस्थापन साध्य करणे आहे. SBM-U चा दुसरा टप्पा 01 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आला, 5 वर्षांच्या कालावधीसाठी (ऑक्टोबर 2026 पर्यंत) SBM-U 2.0 ची ध्येय 2026 पर्यंत सर्व शहरांसाठी “कचरामुक्त” दर्जा प्राप्त करणे आणि नागरिकांमधील वर्तन ‘स्वच्छ’ चे संस्थात्मकीकरण करणे आहे. SBM–U 2.0 ची अंमलबजावणी MoHUA द्वारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमार्फत सर्व शहरांमध्ये केली जाईल (जनगणना 2011 नुसार, आणि त्यानंतर जोडलेली वैधानिक शहरे). शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) 2030 च्या ध्येय प्राप्तीमध्ये योगदान देण्यासाठी SBM-Urban 2.0 अंतर्गत सर्व शहरे ‘कचरामुक्त’ करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या भागीदारीत भारत सरकार वचनबद्ध आहे, ज्यामुळे शेवटी जीवनाचा दर्जा सुधारेल आणि शहरी लोकसंख्येच्या राहणीमानात सुलभता येईल ज्यामुळे शहरी परिवर्तन होईल.
लाभार्थी:
स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी)
फायदे:
१) घनकचरा व्यवस्थापन, २) दुषित सांडपाणी व्यवस्थापन
अर्ज कसा करावा
https://sbmurban.org/