- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976, 1986 व 1999 मधील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.
- पुणे विभागातील जिल्हयांचे पुनर्वसन कार्यालयाकडून प्राप्त होणारे प्रकरणांमध्ये शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे.
- भूमि अधिग्रहण, पुनर्वसन व पुनर्व्यवस्थापनात योग्य भरपाई व पारदर्शकतेच्या हक्काचा कायदा, 2013 नुसार कार्यवाही करणे.
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाअंतर्गत प्रकल्पबाधित खातेदारांचे पुनर्वसित गावठांणामधील नागरी सुविधां बाबत कामाचे प्रस्ताव सादर करणे, निधी वितरीत करणे, प्रशासकीय मंजूरी देणे बाबतचे कामकाज करणे.
- मुख्य लेखाशिर्ष 2235, 2049, 4235, 4701, 4702, 4801 व 6235 या लेखाशिर्षातंर्गत प्राप्त होणा–या अनुदाना करिता आठमाही / वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करुन सादर करणे. अनुदान शासनाकडून प्राप्त झालेनंतर जिल्हयांना वितरीत करणे, समर्पित अहवाल विनियोजन लेखे शासनास सादर करणे.
- पुणे विभागातील पाटबंधारे प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन विषयक कामाचे नियंत्रण अधिकारी म्हणून आवश्यक ते सर्व कामकाज पार पाडणे.