बंद

    ग्रामीण गृह निर्माण योजना

    • तारीख : 01/04/2025 -
    • क्षेत्र: पुणे विभाग

    केंद्र पुरस्कृत योजना
    प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
     उद्देश – “सर्वांसाठी घरे”
    ग्रामीण भागातील कच्चे घर/ बेघर कुटुंबांना मुलभूत सुविधांसह घरकुलाचा लाभ देणे. घरकुलाचे किमान 269 चौ.फू.चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम अपेक्षित. योजनेंतर्गत प्राप्त होणा-या उद्दिष्टाच्या 60%उद्दिष्ट हे अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (SC/ST) व 40% इतर (Others) प्रवर्गास वितरीत करण्यात येते आणि संपूर्ण उद्दिष्टाच्या 5% उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवणे अपेक्षित आहे. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार मार्फत विकसीत केलेल्या आवास सॉफ्ट (AwaasSoft) व Public Fund Management System (PFMS) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना निधी थेट त्यांचे बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येतो.आवास ॲप मार्फत घरकुल बांधकामाचे भौगोलीक परिक्षण(Geo-Tagging) करण्यात येते. योजनेअंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षण (Rural Mason Training) राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
    प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान
     उद्देश -प्रधानमंत्री-जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN) अंतर्गत कोलाम, कातकरी व
    माडीया गोंड या तीन आदीम जमाती करीता गृहनिर्माण योजना.
    • राज्य योजना
     सर्व राज्य योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणच्या धर्तीवर लाभ देण्यात येतो.
     रमाई आवास योजना –
     उद्देश – राज्यातील अनुसूचित जाती (SC) व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजना.
     शबरी आवास योजना –
     उद्देश – राज्यातील अनुसूचित जमाती (ST) घटकांसाठी घरकुल योजना.
     पारधी आवास योजना –
     उद्देश – राज्यातील पारधी समाजातील घटकांसाठी घरकुल योजना.
     अटल बांधकाम कामगार आवास योजना –
     उद्देश – राज्यातील ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना.
     यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना –
     उद्देश – विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गासाठी घरकुल योजना.
     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना-
     उद्देश – राज्यातील ग्रामीण भागातील धनगर समाजातील लोकांकरिता घरकुल योजना.
     मोदी आवास घरकूल योजना-
     इतर मागास, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या समाजासाठी घरकुल योजना.

    लाभार्थी:

    पात्र लाभार्थ्यांची निवड संबंधित जिल्हा परिषदेमार्फत केली जाते.

    फायदे:

    “प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN)” अंतर्गत आदिम जमातीतील (कोलाम, कातकरी व माडिया गोंड) पात्र कुटुंबासाठी प्रति घरकुल रु.2.39 लाख (घरकुल अनुदान रु.2.00 लाख ,स्वच्छ भारत अभियानांतर्गत रु.12 हजार आणि मनरेगा अंतर्गत 90/95 दिवसाचे अकुशल वेतन रु.27 हजार अंदाजे ) एवढे अनुदान अनुज्ञेय आहे.  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजना अंतर्गत घरकुल बांधकामाकरिता रु. 1.20 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय्य अनुज्ञेय असून घरकुल अनुदाना व्यतिरिक्त शासन निर्णय 4 एप्रिल 2025 नुसार सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधून मंजूर करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना रु.50,000/- अतिरिक्त अनुदान (रु.35,000/- घरकुलास अतिरिक्त अनुदान आणि रु.15,000/- प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 KW मर्यादेपर्यंत सौरऊर्जा यंत्रणा उभरणीकरिता), स्वच्छ भारत अभियान (SBM) अंतर्गत पात्र लाभार्थ्यास रु.12,000/- शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान व मनरेगा (MGNREGA) अंतर्गत 90/95 इतक्या अकुशल मनुष्य दिवसांची मजूरी देण्यात येते. (साधारणपणे रु.28,080/-).

    अर्ज कसा करावा

    आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयास संपर्क साधावा.