बंद

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

    प्रकाशित तारीख: September 14, 2025

    ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान राबविण्यात येत आहे.

    सदर अभियानाचे सात मुख्य घटक आहेत –

    1. सुशासनयुक्त पंचायत,
    2. सक्षम पंचायत,
    3. जलसमृध्द, स्वच्छ व हरित गाव,
    4. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण,
    5. गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण,
    6. उपजीविका विकास व सामाजिक न्याय, तसेच
    7. लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. हे अभियान दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबवले जाईल. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार दिले जातील.

    अधिक तपशिलासाठी पुढील शासन निर्णय वाचा –


    शासन निर्णय