शेतातील बांधावर जवळपास 5,000 नारळाच्या रोपांची लागवड
ऊस शेतीच्या बांधावर नारळाची लागवड करण्याची मोहीम पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कृषि विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या यशस्वी मोहीमेत आज आखेर विभागातील सुमारे 59 ग्रामपंचायत मधील 366 लाभार्थ्यांच्या शेतातील बांधावर जवळपास 5,000 नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.