छायाचित्र दालन
शेतातील बांधावर जवळपास 5,000 नारळाच्या रोपांची लागवड
ऊस शेतीच्या बांधावर नारळाची लागवड करण्याची मोहीम पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कृषि विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या यशस्वी मोहीमेत आज आखेर विभागातील सुमारे 59 ग्रामपंचायत मधील 366 लाभार्थ्यांच्या शेतातील बांधावर जवळपास 5,000 नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026
दिनांक 01 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम…. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, शैक्षणीक यंत्रणा तसेच पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक दिनांक 25.09.2025 रोजी 11.00 वाजता म. विभागीय आयुक्त, पुणे यांनी घेतली व या निवडणुकीबद्दल सर्व माहिती दिली.
पुरंदर विमानतळ प्रकल्पा संदर्भात बैठक दिनांक २८ मार्च २०२५ रोजी मा. विभागीय आयुक्त, पुणे
पुरंदर विमानतळ प्रकल्पा संदर्भात बैठक दिनांक २८ मार्च २०२५ रोजी मा. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाचा आढावा, विभागांमधील समन्वय, जमिनीचे अधिग्रहण, पायाभूत सुविधा उभारणी तसेच प्रलंबित बाबींच्या निराकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
व्हाट्सअप्प चॅनेल सुरुवात – विभागीय आयुक्त कार्यालय पुणे
आज विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग चे व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आले. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग चे
व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आले सदर व्हाट्सअप चॅनल चे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते सर्व शाखाप्रमुख यांचे उपस्थितीत करण्यात आले.
संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना विभाग स्तरीय बैठक दिनांक 21 ऑगस्ट 2025
संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना विभाग स्तरीय बैठक दिनांक 21 ऑगस्ट 2025
महा आवास अभियान राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार 2021-22
ग्राम विकास व पंचायत राज विभाग महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2021-22 प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट विभाग तृतीय क्रमांक.
महा आवास अभियान राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार 2020-21
ग्राम विकास व पंचायत राज विभाग महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2020-21 राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट विभाग तृतीय क्रमांक.
माझी वसुंधरा अभियान 3.0 राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २०२२-२३
माझी वसुंधरा अभियान 3.0 पुणे विभागास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २०२२-२३ या वर्षासाठी प्राप्त.
माझी वसुंधरा अभियान 2.0 राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २०२१-२२
माझी वसुंधरा अभियान 2.0 पुणे विभागास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २०२१-२२ या वर्षासाठी प्राप्त.