तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
-
श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर व पालखीतळ मार्ग विकास आराखडा – या आराखडयासंबंधी बैठका आयोजित करण्यात येतात तसेच जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावांस कार्यकारी समितीत मंजूरी घेतली जाते. या आराखडया अंतर्गत प्राप्त होणारा निधी जिल्हाधिकारी यांच्या मागणीप्रमाणे व मा. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या आदेशाने वितरीत केला जातो. तसेच आराखड्या अंतर्गत सुरु असलेल्या कामांची क्षेत्रीय पाहणी करणे व प्रगती अहवाल शासनास सादर करणे.
-
अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोध्दार करणे व स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान स्थळ मौजे तुळापूर, ता.हवेली व समाधी स्थळ मौजे वढु(बु) ता.शिरूर, जि.पुणे या आराखडयासंबंधी बैठका आयोजित करण्यात येतात.
-
पुणे विभागातील इतर आराखडयाच्या कामांच्या प्रगतीवर सनियंत्रण करणे.