नगरपरिषद प्रशासन शाखेतील कामकाज
-
पुणे विभागातील नगरपालिका, नगरपंचायती यांचेवर सनियंत्रण व समन्वय ठेवणे.
-
मुख्याधिकारी, नगरपालिका संवर्ग कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी ,वित्त विषयक बाबी यांची पडताळणी करणे.
-
आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई आणि जिल्हा सह आयुक्त तसेच नगरपरिषदा, नगरपंचायती स्तरावरील यंत्रणा यामध्ये समन्वय साधणे.
-
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार नियामोचित कार्यवाही करणे.
-
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करणे.
-
मा. उच्च न्यायालय, मा. भारतीय हरित लवाद, महाराष्ट्र शासन, मा.अनुसूचित जाती, जमाती आयोग यांचेकडून वेळोवेळी आदेशित करण्यात आलेली महानगरपालिका व पुणे विभागातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती याबाबतची प्रकरणे हाताळणे.