बंद

    नियोजन शाखा

    • नियोजन शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये पुणे विभागातील पुणे , सातारा ,सांगली ,सोलापूर कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात.

    • नियोजन प्रक्रियेत जिल्हा नियोजन समिती व शासन यांच्यात समन्वय साधणे तसेच जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणे.

    • विभागातील जिल्हा नियोजन समिती व त्यांच्या उपसमितीच्या बैठकांना उपस्थित राहणे.

    • सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना , डोंगरी विभाग विकास कार्यक्रम ,अनुसूचित जाती उपयोजना ,आदिवासी उपयोजना ,आमदार स्थानिक विकास कार्यक्रम ,खासदार स्थानिक विकास कार्यक्रम इ. विविध विकास योजनांच्या खर्चाचे सनियंत्रण करून विभागाचा एकत्रित मासिक /त्रैमासिक प्रगती अहवाल तयार करून शासनास सादर करणे.

    • विविध विकास कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या किमान १० कामांची प्रत्येक महिन्यात तपासणी करून संक्षिप्त अहवाल सादर करणे.

    • राज्य शासनाच्या विविध विभागाकडून राबविण्यात येणा-या विकास योजनांची मुल्यमापन अभ्यास पहाणी संबंधित कामे करणे.