निवाडा शाखेचे कामकाज
-
भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १०९ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ मधील नियम क्र. १८(३) मध्ये नमूद नुसार नुकसान भरपाईची रक्कम १० कोटी रूपयांपेक्षा अधिक असेल व १०० कोटी रूपयांपेक्षा कमी असेल तर, संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त प्रारूप निवाड्यास मा.विभागीय आयुक्त यांनी पूर्व मंजूरी देणेपूर्वी प्रारूप निवाड्याची तांत्रिक छाननी करणे व प्रस्तावित दराबाबत पडताळणी करणे.
-
भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १०९ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ मधील नियम क्र. १८(३क) मध्ये नमूद नुसार नुकसान भरपाईची रक्कम १०० कोटी रूपयांपेक्षा अधिक असेल तर, संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त प्रारूप निवाडा मा.विभागीय आयुक्त यांचेमार्फत शासनाच्या पूर्वमान्यतेस्तव सादर करणेकरिता प्रारूप निवाड्याची तांत्रिक छाननी करणे व प्रस्तावित दराबाबत पडताळणी करणे.