पुरवठा शाखेकडील कामकाज
-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना (एएवाय) व प्राधान्य कुटुंब योजना (पीएचएच) अंतर्गत शिधापत्रिका व धान्य नियतन वाटपाबाबत सनियंत्रण करणे.
-
शिवभोजन योजना थाळी वाटपाबाबत सनियंत्रण करणे.
-
आनंदाचा शिधा वाटपाबाबतचे सनियंत्रण करणे.
-
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-४४१७/प्र.क्र.१३५९/नापु-१६ ब दि. २१/०१/२०१७ अन्वये दिलेल्या इष्टांकानुसार शासकीय धान्य गोदाम तपासणी करणे.
-
शासन परिपत्रक क्रमांक साविव्य १०९९/प्र.क्र. ८५९९/नापु २८ दि. २७/०४/२००२ अन्वये दिलेल्या इष्टांकानुसार रास्तभाव दुकान तपासणी करणे.
-
पेट्रोलियम अॅक्ट २००२ कलम १५४ नुसार जिल्हादंडाधिकारी यांचेकडील पेट्रोल व डिझेल पंप उभारण्यासाठी देण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्राबाबत अपिलीय कामकाज पाहणे.
-
महाराष्ट्र अनुसूचित विक्रेय वस्तु (वितरणाचे विनियमन) आदेश १९७५ चे कण्डिका २४ प्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी यांचेकडील रास्तभाव दुकान तपासणी बाबतचे आदेश, नवीन रास्तभाव दुकान जाहिरनाम्याबाबतचे आदेश व रास्तभाव दुकान वारस नोंदी आदेश इत्यादी विषयाबाबतचे अपिलीय कामकाज पाहणे.