रोजगार हमी योजना शाखेकडील कामकाज
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध यंत्रणांची 266 कामे घेण्यात येतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम, कृषी, सामाजिक वनीकरण, रेशीम विभाग, वन विभाग इ. विविध यंत्रणांच्या कामांचे नियंत्रण व पर्यवेक्षण उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) या कार्यालयामार्फत केले जाते.
-
जिल्हा परिषदेकडील पंचायत समिती अंतर्गत येणा-या कृषी, बांधकाम, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे, पाणी पुरवठा विभाग इत्यादी सर्व यंत्रणाचे नियंत्रण व पर्यवेक्षण उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा/पंचायत) यांचेमार्फत केले जाते.
-
पुणे विभागातील मग्रारोहयोच्या कामांचे सनियंत्रण सह आयुक्त ( रोहयो ) पुणे विभाग, पुणे यांचेमार्फत केले जाते.