विकास – आस्थापना शाखेकडील कामकाज
-
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39 (1) अंतर्गत विवाद प्रकरणांवर कार्यवाही करणे.
-
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील दाखल अपिलीय प्रकरणी कार्यवाही करणे.
-
जिल्हा परिषदेतील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची शास्तीविरुध्दची अपील प्रकरणे.
-
ग्रामविकास विभागाने मान्यता दिलेल्या जिल्हा परिषद स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी यांना अनुज्ञेय वाहनांची खरेदी व निर्लेखनबाबत कार्यवाही करणे.
-
जिल्हा परिषद वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या अपवादात्मक बदली व प्रतिनियुक्ती मंजुरीबाबत कामकाज करणे.
-
जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचे समन्वय करणे.
-
दरवर्षी जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची पाच वर्षातून एकदा तपासणी व अहवाल वाचन करणे.
-
ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेस प्राप्त झालेल्या अनुदानांचे अनुदान निर्धारण करणे. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र, शक पूर्तता यांचा आढावा घेणे.
-
महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-1 व वर्ग-2 मधील अधिकारी यांचे आस्थापनाविषयक सर्व बाबींचे समन्वय करणे.
-
महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-2 चे पदोन्नती व बदली बाबतचे कामकाज करणे.
-
जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 कर्मचारी यांचे सेवाप्रवेशोत्तर परिक्षा व विभागीय स्पर्धात्मक परिक्षा कामकाज करणे.
-
जिल्हा परिषदेकडील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विभागीय परिक्षा, सेवाप्रवेशोत्तर परिक्षा, इ. कामकाज करणे.
-
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र व संयुक्त प्रशिक्षण केंद्र यांना अनुदान वितरण करणे, लेखापरिक्षण करणे व अनुषंगीक कामकाज करणे.
-
जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे कामकाज करणे.
-
महाराष्ट्र विकास सेवेकडील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांची पुरस्कारासाठी नावे अंतिम करुन शासनास शिफारस करणे.